आमची प्रक्रिया

महेश काटे यांनी आपल्या संपन्न अनुभवातून आणि संमोहनशास्त्राच्या विस्तृत अभ्यासातून, ‘महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा.लि.’ साठी एक खास प्रक्रिया बनविली आहे. सहा दिवसांची ही प्रक्रिया तुमच्या समस्येचे पद्धतशीरपणे निवारण करते. अनेक व्यक्तींवर महेश काटे सरांनी ही प्रक्रिया काळजीपूर्वक व यशस्वीपणे वापरली आहे.

   1. तुमची सविस्तर माहिती, एका विस्तृत व रचनाबद्ध फॉर्ममध्ये भरून घेतली जाते.
   2. आवश्यकतेनुसार मनोशारीरिक वा मानसिक चाचण्या सांगितल्या जातात.
   3. समुपदेशन हा उपचारातील महत्वाचा टप्पा. तुमच्याशी मोकळा संवाद साधून, लक्षणे व्यवस्थित समजावून घेऊन, समस्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयन्त केला जातो. येथे ‘ट्रान्स’ मध्ये नेले जात नाही. हा संवाद पूर्णपणे खाजगी आणि गोपनीय असतो.
   4. संमोहनाची प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये केली जाते. यामध्ये पूर्व तयारी ते प्रतीगमन ते हिप्रो-हीलिंग या प्रक्रिया येतात. येथे तुमच्या सगळ्या नकारत्मक भावनांचा निचरा होतो. समस्येचे निराकरण करण्याचा प्रयन्त होतो.
   5. उपचारानंतर तुमच्या मानसिक क्षमतांचे सबलीकरण केले जाते. यामध्ये लक्ष्यनिश्चती आणि दिनक्रमाची निश्चती केली जाते. याशिवाय विविध माध्यमांद्यवारे फॉलोअप घेतला जातो.