MKHRC बद्दल

महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा. लि.

‘महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा.लि.’ हे संमोहनाचा प्रभावी व योग्य वापर करून, विविध समस्या सोडविण्यास वा त्यांवर नियंत्रण मिळविण्यास तुम्हाला मदत करते. संमोहनाविषयी गैरसमजुती दूर करून, त्याचा व्यापक प्रसार करणे हे सेंटरचे उद्दिष्ट आहे. तुमच्या समस्येचे नेमके निदान करून, तुमच्याशी विस्ताराने संवाद साधून, तुम्हाला व्यक्तिसापेक्ष उपचार देणे, हे आमचे वैशिष्ट्य आहे.

या सेंटरची स्थापना २००२ मध्ये झाली. सुरुवातीला आम्ही ‘संमोहन स्वास्थ्य सिद्धी उपचार केंद्रा’अंतर्गत कार्यरत होतो. त्यानंतर जसे संमोहन विकसित होत गेले, तसे त्याचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी आणि संमोहनाचा मोठ्या स्तरावर प्रचार करण्यासाठी, ‘महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर’ची स्थापना झाली.

संस्थापक महेश काटे यांचे सखोल ज्ञान आणि १४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सेंटरच्या पाठीशी आहे. अनेक व्यक्तींवर यशस्वी उपचार; पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये प्रभावी काम आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यक्तिसापेक्ष उपचार, यातून केंद्राचे नावलौकिक वाढतेच आहे. विद्यार्थी, महिला, पोलिस, खेळाडू अशा अनेक समाजगटांतील लोकांवर केंद्रामध्ये उपचार केले जातात. एक उपचार पद्धती म्हणून सर्वार्थाने संमोहनाचा विकास आणि प्रचार करणे, या दृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे.

महेश काटे

महेश काटे हे केंद्राचे प्रेरणास्त्रोत तसेच दिशादर्शक आहेत. अहोरात्र काम करण्याची तयारी आणि संमोहनाचा पोटतिडकीने प्रसार करण्याची उर्जा त्यांच्याकडे सततच असते. मुंबई येथील ‘हिप्नोसिस अँड डेव्हलपमेंट सेंटर’मधून त्यांनी संमोहनामध्ये प्रमाणपत्र मिळविले आहे. आत्म-संमोहन, हिप्नो-हिलिंग, प्रतीगमन अशा संमोहनाच्या विविध अंगांमध्ये ते तज्ज्ञ आहेत. १४ वर्षांच्या संपन्न अनुभवामध्ये, त्यांनी अनेक व्यक्तींवर यशस्वी इलाज केला आहे. यातून त्यांनी स्वतःची अशी उपचारपद्धती विकसित केली आहे. संमोहनतज्ज्ञ म्हणून ते विविध माध्यमांवरील चर्चांमधून या शास्त्राचा प्रचारसुद्धा करतात.

Maheash Katay H R C

आरती काटे - महिलांविषयक

आरती काटे यांनी आपल्या उपजत व्यवस्थापन कौशल्यातून सेंटरच्या कार्याची व्यवस्थित घडी बसविली आहे. १० वर्षांच्या आपल्या अनुभवाच्या मदतीने त्या संमोहन उपचारांमध्येही सहभागी असतात. स्त्रियांच्या समस्या समजावून घेणे, त्यांचे हिप्नो-हिलिंग करणे इत्यादी महिलाविषयक कामांमध्ये त्यांची मोठी मदत होते. आरती काटे या सेंटरचा कणा तर आहेतच, पण महेश काटे सरांच्याही त्या उर्जास्त्रोत आहेत.